सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (22:19 IST)

अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन रा भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी  पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. स्कॉटलंड देशातील ग्लास्गो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस (सिओपी-26) कोणतेही अधिकृत निमंत्रण नाही. तरीही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पर्यटन करण्याचे काम चालविले आहे. त्यामुळे “इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
 
या परिषदेला केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी आहे. असं असूनही आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते? त्याचे त्यांना निमंत्रण होते का? राज्यात मागील तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार यांना सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे कारण काय? पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले? अशी प्रश्नांची सरबत्तीच भातखळकर यांनी केलीय. तसंच या संपूर्ण पर्यटन दौऱ्याचा खर्च हा आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा, अशी मागणही भातखळकर यांनी ठाकरे सरकारकडे केलीय.