रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 मे 2021 (18:48 IST)

भाजपा युवा नेत्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली गंभीर जखमांचे निशाण चौकशी करण्याचे आदेश

जालन्यात भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालना पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या युवकाचे नाव शिवराज नारीलवाले असे सांगितले जात आहे. शिवराज जालना हे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. 
 
 
हा व्हिडीओ 9 एप्रिलचा आहे. 9 एप्रिल रोजी जालन्यात एका अपघातग्रस्त युवकाचा शहरातीलखासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याच युवकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी दवाखण्यात हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डची तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या दिवशी हॉस्पिटलमधील शिवराजयांनी तोडफोड केली म्हणून मारहाण केली असल्याचा खुलासा कदीम पोलीस स्टेशनद्वारे करण्यात आला आहे.
 
जालनाच्या या युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केली त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
पीडित भाजप जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्यामुळे मारल्याचे म्हटलं तसंच संबंधित तोडफोडीचा आपला काहीही संबंध नसल्याचेही म्हटलं. त्यांनी म्हटले की रुग्णालयाच्या आवारात पोलीस माझ्या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीला शिवीगाळ करत असतानाचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिग केल्यामुळे पोलिसांनी मारहाण केली.
 
व्हिडिओ व्हायल झाल्यावर पोलिसांच्या या निर्दयी मारहाणीचा निषेध होत असून अनेक नेत्यांनी याची निंदा केली आहे.