1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (10:50 IST)

समृद्धी महामार्गावर कार ट्रकचा मोठा अपघात, दोघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरातसमृद्धी महामार्गावर कार आणि ट्रक ची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर हर्सुल सावंगी परिसरातील नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक 436 वर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कारने ट्रक ला पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आणि कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

तर दोघे जखमी झाले. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या कार मध्ये बसलेले सर्व जण भंडारा जिल्ह्यातील असून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्यासाठी गेले होते.

परत येताना हा अपघात झाला. या अपघातात राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (35) संदीप साखरवाडे (40) हे मयत झालेल्यांची नावे आहे तर रितेश भानादकर आणि आशिष सरवदे हे जखमी झाले आहे.

पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या सहाह्याने कारला ट्रक च्या मागून बाहेर काढून बाजूला केले आणि मृत देह ताब्यात घेतले व जखमींना रुग्णालयात पाठविले. जखमींवर उपचार सुरु आहे. 
 
 Edited by - Priya Dixit