शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मे 2023 (07:53 IST)

कैद्याच्या गुदद्वारात मिळाला मोबाईल; मध्यवर्ती कारागृहातील पोलीस झाले अवाक

jail
नाशिकरोड :- येथील मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याकडे अंग झडतीत गुदद्वारात मोबाईल फोन मिळून आल्याने कारागृह पोलीस अवाक झाले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
कारागृह शपाई देविदास शेषराव जगदाळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की दि. २८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान फिर्यादी जगदाळे आणि त्यांचे सहकारी विभक्त कोठडी क्र १ मधील रूम नंबर ६३ मध्ये असलेले कैदी आदील अबिध शेख, समिर निजाम पठाण उर्फ चींग्या यांच्या रुमची झडती घेतली असता काहीही आढळून आले नाही. मात्र झडती घेत असताना आदिल हा घाबरलेल्या अवस्थेत दिसून आल्याने झडती पथकाला संशय आला.
 
त्यांनी आदिल याची अंगझडती घेतली असता काही मिळाले नाही. मात्र हॅन्ड युज मेटल डिटेक्टर वाजत असल्याने त्यास कारागृह रक्षकांनी स्वच्छता गृहात नेले. त्यास शौचास बसवले असता त्याच्या गुदद्वार तुन एक प्लास्टिक पिशवी बाहेर आली, त्यामध्ये एका कळ्या रंगाचा नोकिया मोबाईल फोन मिळून आला.
 
जगदाळे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गून्हा दाखल केला आहे. अधिक तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.