बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (17:02 IST)

येत्या २४ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता

मुंबई आणि उपनगरांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कोकण किनारपट्टी, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
 
गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेत ४१.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर कुलाबा वेधशाळेत ६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेत १ जूनपासून झालेल्या पावसाची नोंद पाहता यावेळी सामान्य पाऊस पडला आहे. १ जुनपासून कुलाबा वेधशाळेत एकूण २३४६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा सरासरीपेक्षा ५०० मिमी जास्त आहे. तर सांताक्रूझमध्ये एकूण ३३९८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा हा आकडा १३५३.४ मिमी जास्त आहे.