शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (10:54 IST)

पोषण आहारच्या साखरेत मृत बेडूक

वाशीम जिल्ह्यातील शालेय पोषण आहारातील साखरेत बेडूक आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. कारंजा पंचायत समिती अंतर्गत झोडगा येथील अंगणवाडीत हा प्रकार उघडकीस आला.
 
बालकांचं आरोग्य सुधार या दृष्टीने शासनामार्फत ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना आहार पुरवला जातो. झोडगा येथील अंगणवाडीत सुद्धा पोषण आहार पुरवला गेला. ज्यात 4 जुलैला वाटप केलेला आहार जेव्हा विद्यार्थी कबीर खेडकरच्या पालकांनी 5 जुलै रोजी उघडून पाहिला तर त्या साखरेत मृत बेडूक आढळून आले. या प्रकाराची माहिती मिळताच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडीला भेट देऊन पंचनामा केला आणि साखरेचे पाकीट ताब्यात घेतले.
 
साखरेत मृत बेडूक आढळून आलेले पॉकिट तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. या प्रकारामुळे पोषण आहार पुरवणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
photo: symbolic