रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (08:52 IST)

देवेंद्र फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, दिले ‘हे’ कारण

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  सध्या अतिवृष्टी  झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगत भेटण्याचं टाळलं आहे. तर दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील बीडच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.त्यांनी लातूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आता बीडच्या दौऱ्यावर जाणार अशी माहिती होती. परंतु फडणवीस हे सध्या बीडच्या दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. पंकजा मुंडे या आजारी असल्यामुळे फडणवीस यांनी आपला बीड दौरा रद्द केला. 
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी अचानक प्रकृती खराब झाली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुढील चार दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. महत्त्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणापूर्वीच पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. यामुळे पंकजा मुंडे यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळा आहे.