मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (20:59 IST)

देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट, म्हणाले आभार मानू तरी कसे मुक्ताताई

devendra fadnavis
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी दोन्हीवेळेस रुग्णावाहिकेतून विधिमंडळ गाठत भाजपला मतदान केले. त्यामुळे, भाजप नेत्यांकडून त्यांच्या पक्षप्रेमाचे आणि कर्तव्याचे उदाहरण सातत्याने दिले गेले. तसेच, हा विजयही त्यांनाच समर्पित करण्यात आला. आता, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही मुक्ता टिळक यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. सद्यस्थितीतही आजारी असताना त्यांनी ही आपुलकी आणि कर्तव्य निभावल्याने देवेंद्र फडणवीसही भावूक झाल्याचं त्यांच्या ट्विटमधून पाहायला मिळत आहे.
 
'या आपुलकी, जिव्हाळ्याबद्दल मनःपूर्वक आभार. प्रकृती ठीक नसतानाही पक्षासाठी सर्वोच्च भावना राखत राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाला येऊन आपल्या ध्येयसमर्पित जीवनाचे दर्शन तर घडविले होतेच. पण, आवर्जून घरी येत माझे अभिनंदन केलेत. आभार मानू तरी कसे मुक्ताताई...'' अशा शब्दात भावनिक पोस्ट लिहून देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ता टिळक यांचे आभार मानले आहेत.