रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (18:36 IST)

धनंजय मुंडे यांनी भाचीच्या लग्नात या गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा एक आगळा वेगळा रूप बघायला मिळाले. यांनी आपल्या घरातील लग्न समारंभात नवरा नवरीसह डान्स केला. त्यांचे डान्स स्टेप पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सध्या त्यांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वरातीत धनंजय मुंडे हे वर आणि वधूसह त्यांचे हात आपल्या हातात घेऊन बेभान होऊन ''अपनी तो जैसे तैसे कट जायेगी '' या गाण्यावर ठेका देत डान्स करत आहे. त्यांची डान्स स्टेप्स पाहून उपस्थित लोकांनी जल्लोष केला.

हा विवाह सोहळा होता त्यांच्या भाचीच्या लग्नाचा. यांची भाची तेजश्री केंद्रे आणि शरद सोनहिवरे यांचा विवाह सोहळा लातूर येथेहॉटेल कार्निवल येथे पार पडला. या वेळी पंकजा मुंडे देखील आपल्या आईसह उपस्थित होत्या.