गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (16:02 IST)

तुमचा स्वत:वरचा ताबा सुटला का? पाटील यांचा फडणवीस यांना सवाल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एएनआयचा व्हिडीओ त्यांनी रिट्विट करत उद्धव ठाकरेंना जाब विचारला होता. यावर मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना उत्तर देत काश्मीर मुक्त करा याचा अर्थ भेदभावापासून, नेटवर्कवरील आणि केंद्र सरकारच्या जाचातून मुक्त करा असा होतो. तुमच्यासारखे नेते शब्दांचे अनर्थ काढून तिरस्काराची भावना निर्माण करतात. तुमच्यासारखा जबाबदार नेते अशाप्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो यावर विश्वास बसत नाही असा चिमटा काढला.
 
कदाचित सत्ता गमावल्यानंतर असं होऊ शकतं नाहीतर तुमचा स्वत:वरचा ताबा सुटला का? असा प्रश्न  पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनीही जयंत पाटलांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय की, या फुटिरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. हे मतांचे राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर भेदभावापासून मुक्त आहे. तर पूर्वीपासूनच सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरात निर्बंध आहेत. आम्ही विरोधात असो वा सरकारमध्ये आमचं प्राधान्य सर्वात प्रथम राष्ट्राला राहिलं आहे असं फडणवीसांनी जयंत पाटलांना सांगितले.