उन्हाळी पिकांच्या पेरणीवर पाणी टंचाईचा परिणाम
नांदेड (Nanded) : जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांच्या पेरणीवर पाणीटंचाईचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सुमारे २२ हजार ५४४ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. सात तालुक्यांत पाणी टंचाईमुळे कमी क्षेत्रात पेरणी झाली असल्याचे दिसून येत आहे. तर जिल्ह्यातील शेतकर्यांनी बाजरी पिकाकडे पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात कुठेही बाजरीच्या पिकाची पेरणी झाली नाही.
नांदेड जिल्ह्यात खरीप, रब्बीसह ज्या भागात पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी उन्हाळी ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, भूईमुग,सुर्यफुल,तीळ व सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. नांदेड जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे Farmers crops) सरासरी २२ हजार ४४१ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत १२२.७४ टक्के म्हणजे २७ हजार ५४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक उन्हाळी ज्वारीची ९ हजार ३९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक उन्हाळी पिकांची पेरणी ८ हजार ८२५ हेक्टरवर किनवट तालुक्यात झाली असून त्यापाठोपाठ माहूर तालुक्यात ३ हजार ६१० हेक्टरवर पेरणी झाली तर भोकर तालुक्यात २ हजार ३१७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. कंधार तालुक्यात १ हजार ९५५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर उमरी तालुक्यात १ हजार ६०० हेक्टरवर पेरणी झाली. नायगाव तालुक्यात १ हजार १७७ हेक्टरवर पेरणी Farmers crops) झाली. हिमायतनगर १ हजार १६६ हेक्टर पेरणी झाली. लोहा तालुक्यात १ हजार ११२ हेक्टर, बिलोली तालुक्यात १ हजार १११ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.
तर जिल्ह्यात सर्वात कमी (Summer crops) उन्हाळी पिकाची पेरणी ३४६ हेक्टरवर हदगाव तालुक्यात झाली आहे. तर धर्माबाद तालुक्यात ४०७ हेक्टरवर, देगलूर तालुक्यात ४९० हेक्टरवर, अर्धापूर तालुक्यात ५९२ हेक्टरवर, मुखेड तालुक्यात ८४० हेक्टरवर, नांदेड तालुक्यात ९३६ हेक्टरवर आणि मुदखेड तालुक्यात ९९९ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.तर जिल्ह्यात कुठेच बाजरी (Farmers crops) पिकांची पेरणी झाली नाही.
उन्हाळी तृणधान्य पेरणी पीक क्षेत्र
ज्वारी-९ हजार ३९३ हेक्टर,
मक्का – ४ हजार १ हेक्टर
तांदूळ – ३७९ हेक्टर
उन्हाळी कडधान्ये पीक क्षेत्र
मुग – १५५ हेक्टर
उडीद -२१ हेक्टर
इतर -१ हेक्टर
उन्हाळी तेलवर्गीय पीक क्षेत्र
भूईमुग-८ हजार ७११ हेक्टर
तीळ – ४ हजार २५१ हेक्टर
सोयाबीन – ५०६ हेक्टर
सुर्यफुल – ७५ हेक्टर
Edited by -Ratnadeep Ranshoor