शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जानेवारी 2019 (09:20 IST)

खुशखबर : निवृत्त एस टी कर्मचारी वर्गाला मिळणार वेतनवाढीतील फरकाची रक्कम एक रकमी

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिल 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
 
एसटी महामंडळाच्या राज्यातील  13 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा  लाभ होणार असून, जवळपास 240 कोटी रुपयांची फरकाची रक्कम एकरकमी  दिली जाणार आहे.  एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.  कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी  महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी 4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर असून, या वेतनवाढीचा लाभ 1 एप्रिल 2016 पासून देण्याचा निर्णयही देखील झाला आहे. एप्रिल 2016 ते जून 2018 या काळात या  काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आाला. पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही फरकाची रक्कम हप्त्यांमध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.