रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (11:46 IST)

'राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचे बैलांना देखील आवडले नाही' - देवेंद्र फडणवीस

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने शनिवारी (10 जुलै) मुंबईत बैलगाडीतून आंदोलन केलं. पण आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटल्याने गोंधळ उडाला. यावरुन भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
 
ते म्हणाले, "राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचे बैलांना देखील आवडलेले दिसत नाही. त्यामुळेच ती बैलगाडी तुटली."
 
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. मात्र बैलगाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते चढल्याने बैलगाडी तुटली. याचा व्हीडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. हीच संधी साधत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली.
 
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाक्ष्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आघाडी आणि युतीचा विचार न करता कामाला लागा. शिवसेना बळकट करा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांना देतात तेव्हा चालतं. पण तेच मी बोललो तर त्रास होतो."