शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2023 (22:26 IST)

Exams शिवाजी विद्यापीठातर्फे होणाऱ्या परीक्षा रद्द

exam
Exams conducted by Shivaji University are cancelled  शिवाजी विद्यापीठ संलग्न तिन्ही क्षेत्रातील महाविद्यालये असणारी अनेक गावांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. त्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे. तसेच राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे आहे. एकूण पावसाचे वातावरण पाहता शिवाजी विद्यापीठातर्फे उद्या (दि. 28) होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षेची तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. तरी महाविद्यालये, विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.