सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (08:13 IST)

चिमुकलीचा असा बाल हट्ट ! देवेंद्र फडणवीसांनी केला‘हॅप्पी बर्थडे’साठी व्हिडीओ कॉल…

दापोलीत भाजपची कोकण विभागातील जिल्हा आढावा बैठक एका चिमुकलीच्या हट्टापायी खोळंबली असती. भाजपच्या दापोलीचे उपाध्यक्षांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यामुळे मुलीने बाबांसमोर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, नाहीतर जाऊ नका!, असा हट्ट धरला होता. हा हट्ट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरवला.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपाच्या आढावा बैठकी होत्या. दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे सुद्धा या बैठकीला निमंत्रित होते. मात्र त्यांची मुलगी प्रचितीने त्यांना बैठकीला जाऊ न देता वेगळाच हट्ट केला. तुम्ही जर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, नाहीतर जाऊ नका! असा हट्ट धरला होता. त्यामुळे केदार यांची पंचाईत झाली होती. केदार साठे यांनी वचन दिले आणि मगच ते बैठकीला येऊ शकले.बैठक झाल्यानंतर केदार साठे यांनी हा किस्सा देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर टाकला आणि या नेत्याने लगेचच प्रचितीशी संवाद साधायची तयारी दर्शविली.केदार साठे यांनी देवेंद्र फडणवीस यांना व्हिडीओ कॉल लावून दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचितील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तीची चांगली विचारपूस केली.