रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (21:30 IST)

अन्न व औषध प्रशासनाच्या मिठाई व खाद्य उत्पादकांना “या” सूचना

Sweets
सणासुदीचे दिवस लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाई व अन्य खासगी उत्पादक व्यवसायिकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना येत्या डिसेंबरपर्यंत अंमलात राहणार असून, संबंधितांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त ग.सु.परळीकर यांनी केली आहे.प्रशासनातर्फे ग्राहकांना सुरक्षीत व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने अन्न व्यावसायिकांना खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
 
अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त ग.सु.परळीकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मिठाई ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा. कच्चे अन्न पदार्थ जसे दुध, खवा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी हे परवानाधारक व नोंदणीधारक व्यावसायिकांकडुनच खरेदी करावेत व त्यांची खरेदी बिले जतन करावीत.अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत. त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्त या बाबत कामगाराची वैद्यकीय तपासणी करावी. मिठाई तयार करतांना केवळ फुड ग्रेड खाद्यरंगाचाच १०० पी.पी.एम.च्या मर्यादित वापर करावा.दुग्धजन्य पदार्थाची मिठाईचे सेवन त्वरित करण्या बाबत निर्देश देण्यात यावेत. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकुन ठेवावे.अन्नपदार्थ तयार करतांना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळाच तळण्यासाठी वापरण्यात यावे. नंतर वापरलेले तेल रिको अंतर्गत नेमण्यात आलेल्या एग्रीकेटर यांना देण्यात यावे, आदी सूचनांचा समावेश आहे. स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणुन करु नये. विक्रेत्यांनी त्यांचे विक्री बिलावर त्यांचेकडील एस एस एस ए आय परवाना क्रमांक नमुद करावा.विक्रेत्यांनी दुध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा या सारख्या नाशवंत पदार्थांची वाहतुक ही योग्य तापमानास व सुरक्षीतरीत्या करण्यात यावी.