बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (10:36 IST)

गडचिरोली भूसुरुंग स्फोटा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक

गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळखेडा-लवारी गावादरम्यान करण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटात एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कैलास रामचंदानी असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ३० एप्रिलच्या रात्री नक्षलींनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने आणि यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर १ मे रोजी जाभूळखेडा-लवारी गावादरम्यान भूसुरुंगस्फोट घडवून आणला. यात १५ पोलीस आणि एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. 
 
या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना अचानक मोठं यश मिळालं. सुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी आणि सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली होती.