सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (09:27 IST)

मुंबई कोकणात आणि इतर ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात कोकणात जोरदार पाऊस होईल, असा हवामान विभागाने इशारा दिला असून, ठाणे आणि मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर कोकणात, रायगड भागात मुसळधार ते अतिमुसळधार होईल तर मुंबई ठाणे पालघर ते रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. कमी दाबाच्या पट्टयामुळे नांदेड औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल. मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच जोरदार पावसाने  हजेरी लावली आहे. मुंबईच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले तर घाटकोपर मुलुंड, भांडूप, ठाणे, कल्याण, पालघर, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली अशा अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत हाय अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे काम असेल तरच बाहेर पडलेलं नागरिकांना फायद्याचे ठरणार आहे.