बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (11:41 IST)

हिंगोलीत पुलावरुन चारचाकी खड्ड्यात पडल्याने 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोलीच्या राज्य महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात गाडीपडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या जिंतूर -सेनगाव रस्त्यावर भरधाव कार पुलाचे काम चालू असलेल्या खड्ड्यात पडली. या भीषण अपघातात खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात कार बुडुन चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. 
 
शहराजवळ सेनगाव-जिंतूर रस्त्यावर रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी कार पुलाचे काम सुरु असलेल्या खड्ड्यात पडली. खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावासाचं पाणी साचलेलं होतं. त्यात कार बुडाली. कारचे काच बंद असल्याने त्यातील चार जणांना गुदमरुन मृत्य झाला. 
 
विजय ठाकरे रा. धनोरा, गजानन सानप, त्रंबक थोरवे आणि यांसह एक अन्य लोणार तालुक्यातील रहिवासी असा चार जणांना मृत्यू झाला. रस्त्यावर वाहतूक नसल्याने हा प्रकार उशिरा लक्षात आला. मद‍त मिळेपर्यंत चारही जणांचा मृत्यू झाला होता. मृतक आपल्या मुलांना क्लासेस लावण्यासाठी नांदेड येथे गेले होते. परत येताना असा दुदैवी प्रकार घडला.
 
रखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. पुढील तपास सुरु आहे.