सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (15:48 IST)

भयंकर, पत्नीने चाकूने भोसकून पतीची केली हत्या

औरंगाबादमध्ये पत्नीने चाकूने भोसकून पतीची हत्या केली आहे. मध्य रात्रीच्या सुमारास औरंगाबाद शहरातील उल्कानगरी भागात हा प्रकार घडला आहे. शैलेश राजपूत असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. रात्री घरात वाद झाल्याने पत्नीने रागात पतीची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पत्नीने रागात चाकूने पतीवर वार केले. यात पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. घरात असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीने नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
पती पत्नीमध्ये जेव्हा वाद झाला. तेव्हा घरात त्यांचा सहा वर्षाचा मुलगा होता. त्याच्यासमोरच दोघांमध्ये वाद शिगेला गेला आणि पत्नीने रागाच्या भरात पतीवर चाकूने वार केला. या हल्ल्यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.