शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (20:52 IST)

माझ्यावेळेला त्यांची अशी नाराजी मी पाहिली नव्हती : उद्धव ठाकरे

uddhav ajit panwar
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. परंतु, अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याचे कारण देत ही चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे सर्वोसर्वा उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदेड मृत्यूप्रकरणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
अजित पवार नाराज होऊन आपल्या पद्धतीने कामं करून घेतात का? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्यावेळेला त्यांची अशी नाराजी मी पाहिली नव्हती. माझ्यावेळेला ते माझ्यासोबत चांगले होते. पण, ते चांगलं काम करत होते म्हणून ज्यांच्या पोटात दुखत होतं त्यांच्या उरावर अजितदादा आता बसलेले आहेत. त्यामुळे खरं अजितदादा ज्यांच्यामुळे उरावर बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजेत. आणि ज्यांनी त्यांना बसवलंय त्यांच्याही ते उरावर बसलेत त्यामुळे त्यांनीही नाराज व्हायला पाहिजे.”
 
Edited By - Ratnadeep Ranshoor