गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (17:38 IST)

ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा मिटवा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारने राज्यातील जनतेची सरळसरळ फसवणूक केली आहे. ज्यांनी विज बिल वापरली त्यांनी विजेची बिलं भरावी याच दुमत नाही, पण ज्यांनी वापरलीच नाही, जी वीज वापरलीच नाही त्यांचं बिल का द्यायचं? असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच, सरकारमधील विसंवादावर बोलताना, तुम्हाला ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा मिटवा, असे फडणवीस यांनी म्हटले. 
 
विज बिलाच्या सवलतीवर एकमताने निर्णय का झाला नाही. राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्टेटमेंटचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी अद्याप का निर्णय घेतला नाही. या सर्वच नेत्यांच्या संवादात कुठेही एकमत दिसत नसल्याचं फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलं. मुख्यमंत्र्यांनी विज बिलासंदर्भात मौन धारण केलं, एक अक्षरही ते बोलले नाहीत, हा कसला संवाद आहे. अध्यक्ष महोदय तुम्हाला विसंवाद करायचाय विसंवाद करा, एकमेकांची डोकी फोडायचीत फोडा, नका फोडू तशी... पण फोडायची असतील तर फोडा, पण किमान तुम्ही जी आश्वासनं दिली, ती तरी पूर्ण करा. आम्ही मोफत वीज देणार हे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वत:हूनच घोषित केलं होतं, याची आठवणही फडणवीस यांनी करुन दिली.