शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (14:48 IST)

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुणे, नाशिक, केंद्रावर पुन्हा गोंधळ झाला

आरोग्य विभागाची परीक्षा आज होणार असून पुणे, नाशिकच्या परीक्षा केंद्रावर आज पुन्हा गोंधळ झाल्याचे वृत्त मिळत आहे. पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेज कॅम्प मध्ये सकाळी 10 वाजता परीक्षा सुरु होणार असून 10 :02 वाजता देखील प्रश्नपत्रिका वाटलेली नव्हती. तसेच विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था देखील व्यवस्थित नव्हती. नाशिक मध्ये देखील परीक्षा केंद्रावर वेळेत पेपरच आलेला नव्हता आणि आसन व्यवस्था  केलेली नव्हती या घोळावरून परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. 
 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षेत गोंधळ झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या परीक्षेत तंत्रिक कारणास्तव  विलंब झाला आहे. विध्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली जाईल त्यांनी घाबरून जाऊ नये.