राज्यात नव्या कोरोनाचा शिरकाव, ८ जणांना लागण
महाराष्ट्रात नव्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील ८ जणांना नव्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाबाबत वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत आरोग्य विभाग आणि मनपा आयुक्तांशी चर्चा केलीय. तसंच अधिक खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.