जयंत पवार : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, नाटककार जयंत पवार यांचं निधन
ज्येष्ठ लेखक आणि नाटककार जयंत पवार यांचं रविवारी (29 ऑगस्ट) पहाटे निधन झालं आहे.
जयंत पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
जयंत पवार यांना 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.'काय डेंजर वारा सुटलाय' या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मिळाला.
या नाटकाला नाट्यलेखन स्पर्धेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक सुद्धा मिळाले.2014 साली महाड येथे झालेल्या 15 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार अध्यक्ष होते.
जयंत पवार यांनी अधांतर, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप),बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक), माझे घर अशी अनेक नाटकं लिहिली.
पवार यांच्या 'अधांतर' या नाटकावर 'लालबाग परळ' हा मराठी चित्रपट बनविण्यात आला.