बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (08:39 IST)

जयेशचे पाकमध्ये फोन, संघावरील नाराजीतून गडकरींना धमक्या

nitin
नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने बेळगाव कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. फोन कॉल ट्रेस होऊ नये यासाठी तो विशिष्ट सॉफ्टवेअरचा उपयोग करायचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराजीतून त्याने गडकरींना धमकीचा फोन लावला होता.
 
कर्नाटकातील तुरुंगात जयेशचा पीएफआयच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचा सचिव मोहम्मद अफसर पाशा याने ब्रेनवॉश केले होते. पाशा तुरुंगात असताना त्याच्याकडे मोबाइल असायचा आणि त्या मोबाइलमध्ये त्याच्याकडे विशेष सॉफ्टवेअर होते. तेच सॉफ्टवेअर जयेशने काही काळ वापरले होते. त्याने भारतातील विविध ठिकाणी फोन केले होते. शिवाय पाकिस्तान, अमेरिका, सुदान, नायजेरिया आणि पोलंडमध्येही  संपर्क साधल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्याने नेमका कुणाला संपर्क केला होता हे एनआयएच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.
 
म्हणून काढला गडकरींवर राग
पीएफआयवर बंदी येऊ शकते, तर संघावर बंदी का नको हा विचार जयेशच्या मनात घोळत होता.
गडकरी संघाच्या जवळचे असल्याने त्याने त्यांच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor