शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 सप्टेंबर 2023 (11:01 IST)

Kalyan : गरोदर महिलेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बाळाला जन्म दिला

baby legs
डॉक्टरांना देवाच्या नंतरचा दर्जा दिला गेला आहे. पण कल्याण मध्ये डॉक्टरांचा अमानुषकी पणाचा प्रकार दिसून आला आहे. येथे एका रुग्णालयात डॉक्टरांनी गरोदर महिलेला दाखल करण्यास नकार दिल्यामुळे या महिलेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टरांचा आणि रुग्णालयाचा कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे 
 
सदर घटना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाची आहे कल्याणच्या स्काय वॉक वर एका गरोदर महिलेला प्रसूतिवेदना सुरु झाल्या. नागरिकांनी पोलिसांना तातडीनं कळवलं.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला नागरिकांच्या मदतीने एका हातगाडीवर ठेवून रुक्मिणी रुग्णालयात नेले असता तिथल्या डॉक्टरांनी आमच्या कडे स्टाफ नाही आम्ही या महिलेला दाखल करून घेणार नाही असे उत्तर दिले. या वर पोलीस आणि नागरिकांनी तिला दाखल करू तिची प्रसूती करण्याचे डॉक्टरांना म्हटले. मात्र रुग्णालयाच्या स्टाफने चक्क नकार दिला.

महिला प्रसूती वेदनेने कळवळत होती तिचे बाळ अर्ध बाहेर आलेले असून देखील स्टाफने दाखल करण्यास नकार दिल्यामुळे काही वेळाने महिलेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच बाळाला जन्म दिला. सुदैवाने बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहे. प्रसूती नंतर महिला आणि तिच्या बाळाला रुग्णवाहिकेतून महापालिकेच्या वसंत व्हॅली रुग्णालयात पाठविले. या प्रकरणाबद्दल रुक्मिणी रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितले की आम्ही आमच्या वरिष्ठांच्या सांगितल्याशिवाय काहीही उत्तर देणार नाही. नागिरकांनी रुग्णालयाच्या या कारभारामुळे संताप व्यक्त केला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit