गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (21:05 IST)

चला कास पठाराला जाऊया, हंगामाची सुरूवात 10 सप्टेंबरपासून होणार

kas pathar
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावरील हंगामाची सुरूवात 10 सप्टेंबरपासून होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना यावर्षी खुले करण्यात येणार आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
 
कास पठाराची आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहाणी केली. येणाऱ्या काही दिवसात हे पठार फुलांनी बहरू लागणार असल्यामुळे हा दौरा करण्यात आला. दौऱ्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल, पर्यटन मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक गौतम पठारे, उपप्रादेशीक परिवहन विभागाचे वरिष्ठ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
 
असे आहे नियोजन
शनिवार 10 तारखेपासून कासचा हंगाम सुरू होणार
9 तारखेपासून ऑनलाईन बुकिंग सेवा सुरु होणार
पर्यटकांना कास परिसरात वाहने घेऊन जाता येणार नाहीत
पुण्याच्या पीएमपीएल विभागामार्फत पर्यटकांसाठी इलेक्ट्रीक बस उपलब्ध होणार
परिसरातील ग्रामस्थांची या इलेक्ट्रिक बसमध्ये गाईड म्हणून नियुक्ती करणार
 कास पठाराला संरक्षणाच्या नावाखाली जाळ्या उभारल्या आहेत त्या तात्काळ काढा  
एमटीडीसी मार्फत शौचालये उभी केली जाणार