गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (22:39 IST)

महिला सुरक्षा : भाजपाच्या महिला आमदारांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना लिहिलं एक पत्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील महिला अत्याचारांचं वाढतं प्रमाण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करणारं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. महिला सुरक्षेसंदर्भातील चर्चेसाठी विधिमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन बोलवावं अशा सूचना देखील यावेळी राज्यपालांनी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या या पत्राला प्रत्युत्तर दिलं आहे. “महिला अत्याचाराचा विषय एखाद्या ठिकाणापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे, देशातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचं चार दिवसांचं विशेष सत्र बोलवावं. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे तशी मागणी करावी”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या प्रत्युत्तरानंतर भाजपाच्या महिला आमदारांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे.
 
भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ, आमदार विद्या ठाकूर, आमदार देवयानी फरांदे, आमदार मनिषा चौधरी, आमदार सीमा हिरे, आमदार श्वेता महाले पाटील, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार डॉ.नमिता मुंदडा, आमदार मंदा म्हात्रे, आमदार भारती लव्हेकर, आमदार मोनिका राजाळे, आमदार मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे.