सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (15:16 IST)

प्रियकराने प्रेयसीसह तिची मुलगी, नातीला पेटवले

नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेत नऊ महिन्यांच्या चिमूरडीचा मृत्यू झाला आहे. तर प्रेयसी आणि तिची मुलगी सुमारे ७० टक्के भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर प्रियकर फरार झाला आहे. 
 
याप्रकरणात संगीता सुरेश देवरे (वय ३८) या महिलेचे उत्तर प्रदेशातील मथुरा येथील संशयित आरोपी जलालुद्दीन खान (50) नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री त्यांचे वाद झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास प्रियकर खान याने प्रेयसी संगीता देवरे, संगीताची मुलगी प्रीती रामेश्वर शेंडगे व प्रितीची नऊ महिन्यांची मुलगी सिद्धी रामेश्वर शेंडगे या तिघींच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये नऊ महिन्यांची चिमूरडी सिद्धीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे प्रीती आणि सिद्धी या दोन दिवसांपुर्वीच आईला भेटण्यासाठी आलेल्या होत्या.