माघी एकादशी : विट्ठल रखुमाईचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला
पंढरपुरात माघी एकादशी सोहळ्याला आलेल्या भाविकांनी ६५ एकर मधील परिसर तंबू, राहुट्यांनी हाऊसफुल झाला आहे. येथे सुमारे पावणे दोन लाख भाविकांची निवासाची सोय करण्यात आली आहे. दिवसभर येथे भजन, किर्तन व प्रवचनाने भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. पहाटे श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. माघी एकादशीनिमित्त विट्ठल रखुमाईचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.
भक्तीसागर येथील ३९१ प्लॉटचे वाटप पुर्ण होऊन खुल्या जागेत ९० प्लॉट तयार करुन भाविकांना वाटप करावे लागले आहेत. या ठिकाणी १२५ हून अधिक लहान मोठ्या दिंड्यांनी मुक्काम केला आहे. सुमारे १ लाख ७० हजार भाविक येथे यात्रेनिमित्त तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करत आहेत.