गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2017 (16:29 IST)

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, मुख्यमंत्री सुखरूप

नाशिकमध्ये मुक्कामीअसणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उड्डाणानंतर पुन्हा खाली उतरवण्यात आलं. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यानं एकाला खाली उतरवून दिल्यानंतर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह मुख्यमंत्री औरंगाबादला रवाना झाले. सारंगखेडाच्या चेतक महोत्सवाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री रात्री उशिरा नाशिक मुक्कामी आले होते. 

सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवरून त्यांच्यसह हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आलं. या अगोदर २ वेळा मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरसोबत अपघात होता होता टळला आहे.