मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (08:16 IST)

चिमुकलीचा रुग्णवाहिकेतच गळा दाबून खून; निर्दयी आईला पोलिसांकडून अटक

crime news
पोटच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपाखाली दि. ७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या निर्दयी मातेला दि. ८ नोव्हेंबर रोजी होते. न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी आरोपी मातेस दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
 
तेल्हारा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वाडी आदमपूर येथील श्रेया गजानन भदे हिची तब्येत बरी नसल्याने मारल्याची तिला दि. ७ नोव्हेंबर रोजी तिची आई लक्ष्मी गजानन भदे व तिचा मामा सौरव बरिंगे यांनी उपचारार्थ शासकीय ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून पुढील उपचारार्थ अकोला येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.
 
रुग्णवाहिकेने अकोल्याला जात असताना तिच्या आईने तिचा गळा आवळून तिला मारल्याची बाब शवविच्छेदन अहवालावरून उघडकीस आली. दि.७ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आरोपी मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. मंगळवारी आरोपी लक्ष्मी गजानन भदे (वय २६) हिला पोलिसांनी तेल्हारा न्यायालयात हजर केले असता वि न्यायाधीशांनी दि. १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला. सपोनि ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रमेश धामोडे पुढील तपास करीत आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor