1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 23 एप्रिल 2024 (09:50 IST)

नाशिक: मित्रानेच मित्राच्या घराला आग लावून कुटुंबीयांना मारण्याचा केला प्रयत्न

fire
मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ कारणा वरून एकाने दुसरा मित्र घरी नसतांना त्याच्या घराला आग लावून त्याच्या कुटूंबियांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
 
प्रसंगवधान राखल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून नाशिकरोड पोलिसात त्या दुष्ट मित्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, श्रीमती कल्याणी संतोष मोरे (रा. लक्ष्मी नगर, पिंपळपट्टी रोड, मोरे मळा, जेलरोड) या आपल्या चार मुलामुलीसह राहतात. त्यांचा मुलगा प्रथमेश मोरे व शेजारी राहणारा निखिल बोराडे हे मित्र आहेत. त्यांचे यामुळे एकमेकांच्या घरी जाणेयेणे आहे.
 
तीन आठवड्या पूर्वी या मित्रांमध्ये काही तरी कारणावरून भांडण झाले होते, तेव्हा निखिलने प्रथमेशच्या घरात घुसून तोडफोड केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलिसात तक्रार केली होती. याचा राग निखिल च्या मनात होता. प्रथमेश मुंबईला कामानिमित्त गेला असता निखिलने रात्रीच्या सुमारास त्यांच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून दरवाज्याला व बेडरूमच्या उघड्या खिडकीतून पेट्रोल टाकून आग लावली.
 
घरात आग लागल्याचे लक्षता येताच कल्याणी मोरे व त्यांच्या मुलांनी आराडा ओरड केली. आवाज ऐकून शेजारच्यांनी आग विझवण्यास मदत केली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात निखिल बोराडे विरोधात जीवे ठार मारण्याची फिर्याद दाखल केली. पोलीस तपास करीत आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor