बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (08:54 IST)

निसर्ग चक्रीवादळ : पडझड झालेल्या घरांना १५ हजारापासून दीड लाख लाखापर्यंत मदत

निसर्ग चक्रीवादळात पडझड झालेल्या घरांना १५ हजारापासून दीड लाख लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती आणि मदत व्यवस्थापनाच्या निकषांपेक्षा अधिकची मदत देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्यानुसार पुर्णतः पडझड झालेल्या घरांना दीड लाख तर अंशतः पडझड झालेल्या घरांना १५ हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. याशिवाय वादळग्रस्तांना दोन महिन्यांचे अन्नधान्य दिले जाणार आहे. सोबतच निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वाढीव मदतीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
 
गेल्या आठवडयात निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना जोरदार फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत रायगड जिल्ह्याचा दौरा करून रायगडसाठी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यानंतर रत्नागिरीला ७५ कोटी तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटी रुपयांच्या तातडीची मदत जाहीर करण्यात आली होती. या  बैठकीत वादळानंतरच्या परिस्थितीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला.