सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कितीही चौकश्या करा तोंड बंद ठेवणार नाही - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमंलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल  नऊ तास चौकशी केली आणि त्यांना सोडण्यात आले. जेव्हा त्यांची चौकशी पूर्ण झाली ते घरी गेलेल्या राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.  राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसमोरची त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
 
जवळपास नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यांची सकाळी 11.30 वाजता सुरु झालेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत चालली. चौकशी संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर आले आणि गाडीत बसले. राज ठाकरेंचे कुटुंबीय जवळपास दोन तासांपासून बाहेर वाट पाहत होते. सकाळी राज ठाकरेंना सोडण्यासाठी आलेले कुटुंबीय बाजूच्याच हॉटेलमध्ये थांबले होते.