बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:00 IST)

चोरी करतांना बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

नाशिक शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोराला आपला जीव गमवावा लागल्याची घटना द्वारका भागातील कन्नमवार पुलाजवळ एका इमारतीत घडली आहे.
 
ट्रॅक्टर हाऊस येथील कन्नमवार पुलालगत असलेल्या स्टार लाईन या व्यवसायिक इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीत चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार जणांपैकी एकाचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
 
मूळचा नंदुरबार येथील राहणारा चंदू सामा रहासे असं या घटनेत मृत्यू झालेल्या तीस वर्ष इसमाचे नाव आहे. स्टार लाईन या इमारतीत चोरीछुपे पद्धतीने प्रवेश करून मयत चंदू सामा रहासे याच्यासह त्याचे अ’ल्प’व’यीन दोन साथीदार गेल्या अनेक दिवसांपासून गज चोरत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
मध्यरात्रीच्या सुमारास चंदू सामा रहासे हा तिसर्‍या चौथ्या मजल्यावरून चोरी करत होता.स्टार लाईन कॉम्प्लेक्स या इमारतीतील पडलेले गज खाली फेकत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.त्यानंतर त्याच्या साथीदारांकडून जखमी साथीदाराला उपचारासाठी चोरीछुपे मार्गानेच घेऊन जात असताना वाटेतच त्याला सोडून देत  तेथून पळ काढला.प्रथमदर्शनी हा खु’ना’चा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली.त्यावेळी स्टार लाईन बिल्डींगच्या उजव्या बाजूस मोकळ्या जागेत जमिनीवर र’क्त पडल्याचे दिसून आले.त्यानंतर त्याचे साथीदार शोधले आणि त्यांनी दिलेल्या महिनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.