शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

साई भक्तांसाठी खुशखबरी, शिरडीत दर्शन-आरतीसाठी ऑनलाईन बुकिंग

साईबाबाच्या भक्तांना नवीन सुविधा मिळणार आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिरडी अॅपमध्ये आता तीन नवीन सुविधा जोडण्यात आल्या आहेत. या द्वारे भक्त आता साईबाबा दर्शन, आरती आणि खोलीची ऑनलाईन बुकिंग करू शकतील.
 
यासोबतच आता कन्फर्म रेल्वे तिकिटासह साई दर्शन पासदेखील आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज 1000 पास वाटण्यात येतील. ई-रेल्वे तिकीट आरक्षण करतेवेळीच साई दर्शनाचे पासेस आरक्षित करण्याची सुविधा संस्थानच्या वेबसाइट उपलब्ध आहेत. ही सुविधा शिरडी, कोपरगाव, नगरसूल, मनमाड व नाशिक या स्थानकांचे ई-रेल्वे तिकीट आरक्षित करणार्‍या भाविकांना उपलब्ध आहे.