शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (07:47 IST)

विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं- रोहित पवार

मुंबई देशात करोनाचा उद्रेक सुरू आहे. दररोज चार लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. करोनाची दुसरी लाट हळूहळू संपूर्ण देशात पसरत आहे. करोनाचा हॉटस्पॉट म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात होतं. मात्र महाराष्ट्राने लॉकडाउनचा निर्णय घेत करोनावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. काल राज्यात नवीन ८२२६६कोरोना बाधित रुग्ण बरे झाले तर ५३६०५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. राज्य सरकार करत असलेल्या कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने देखील मुंबईमध्ये सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले होते. मात्र विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत करोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते.
 
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पावार यांनी विरोधकांना शाब्दीक चिमटा काढला आहे. “कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!”, असा सल्ला रोहित पवारांनी विरोधकांना दिला.
 
कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!
 
तसेच विरोधक कोविड रूग्णांच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत राज्य सरकारवर आरोप करत असतात, याला देखील रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. “कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!”, असे ते म्हणाले.