गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (21:45 IST)

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकींवर पंकजा मुंडे यांचा बहिष्कार

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडेंनी घेतला आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि इतर लोकांनी सहकार मंत्र्यांवर दबाव आणला असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही उमेदवार बीड जिल्हा बँक चालवण्यासाठी पात्र नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 
 
पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, बीड जिल्हा निवडणूक प्रक्रियेवर निषेध केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे. त्यामुळे आम्हाला माणणारा मतदार वर्ग या निवडणूकीकडे फिरकणार नाही. या निवडणूकीत जिंकूण येण्याची जी आमची क्षमता आहे ती पुढेही काय राहणार आहे. निवडणूक झाली तर ती पूर्ण न्यायप्रक्रियेने झाली पाहिजे, या निवडणूकीत लोकशाही पद्धतीने निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
 
बीड जिल्हा बँकेची निवडणुकीचे मतदान प्रक्रिया काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे आता  शनिवार २० मार्च २०२१ रोजी होणाऱ्या निवडणूकीमध्ये भाजप कुठेही दिसणार नाही. त्यांचे उमेदवारही या निवडणुकीला हजर राहणार नाही आहेत. बीड जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या हाती आहे.