शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 9 एप्रिल 2022 (21:52 IST)

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला 2022 च्या ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या साताऱ्यातील 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये चित्तथरारक लढतीत कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकर याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. अंतिम कुस्ती पाहण्यासाठी छत्रपती शाहू क्रीडा संकुलात हजारो कुस्ती प्रेमी उपस्थित होते.

साताऱ्यात रंगलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नवा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरच्या पैलवान पृथ्वीराज पाटील याने मिळवून केसरीची गदा पटकावली. उप महाराष्ट्र केसरीचा मान मुंबईच्या विशाल बनकर याला मिळाला.  

किताब पटकाविण्यासाठी पृथ्वीराज आणि विशाल बनकर यांच्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दोघांमध्ये जबरदस्त झुंज बघायला मिळाली.शेवटचा डाव पालटण्यास विशाल अपयशी ठरला आणि पृथ्वीराज ने 5 -4 अशी आघाडी घेत महाराष्ट्र केसरी गदा पटकावली.विजेते झाल्यावर कुस्तीप्रेमींनी जल्लोष केला.