गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (16:28 IST)

दुध पिशव्याचे उत्पादन बंद होणार

राज्यातील प्लास्टिक बंदी व त्याबाबत होत असलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर येत्या दि. 15 डिसेंबरपासून दुधाला लागणार्‍या पिशव्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय प्लास्टिक उत्पादकांनी घेतला आहे. त्यामुळे दूध संघांच्या अडचणी वाढणार आहेत.. 
 
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्यात दि.23 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. मात्र, त्यातून काही बाबी वगळण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात आली होती. बंदी लागू केल्यानंतर त्याला स्थगिती देण्यास सरकारने नकार दिला. त्या पार्श्‍वभूमीवर दूध पुरवठ्यासाठी केल्या जाणार्‍या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करण्यात उत्पादकांनी नकार दिला आहे. 30 पैशांची पिशवी 50 पैशाला कशी घेणार? प्लास्टिक बंदीनंतर रिसायकलिंगचा पर्याय पुढे करण्यात आला. दुधाची अर्ध्या लिटरची पिशवी 50 पैशांना विकत घेण्याचे बंधन घालण्यात आले. मात्र, याच पिशवीसाठी जी फिल्म दिली जाते, तिची किंमत ही 30 पैसे असल्याने  उत्पादकांसमोर अडचण आहे.