सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2020 (08:17 IST)

रणजितसिंह मोहिते-पाटील पुन्हा एकदा गृह विलगीकरणात

भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा दुसऱ्यांदा अकलूजमध्ये गृह विलगीकरण करून घेतले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक व अन्य कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते हे गेल्या १० जून रोजी मुंबईत धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी मुंडे हे करोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते यांनी अकलूजमध्ये गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 
यापूर्वीही, मुंबईत विधान भवनात विधान परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेऊन अकलूजला परतल्यानंतर त्यांनी स्वतःला १४ दिवस घरात विलगीकरणात राहणे पसंत केले होते.