1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (08:22 IST)

रत्नागिरीत पैशाच्या वादातून तरूणावर धारदार कोयत्याने खूनी हल्ला

crime
रत्नागिरी : शहरातील पऱ्याची आळी येथे पैशाच्या वादातून तरूणावर धारदार कोयत्याने खूनी हल्ला करण्यात आल़ा. ही घटना बुधवारी रात्री 8च्या सुमारास घडल़ी नागेश पकाश गजबार (27, ऱा कुवारबाव रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आह़े. नागेश याच्यावर सपासप वार केल्यानंतर तिघे संशयित लागोलाग फरार झाल़े. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी नागेश याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल़े.
 
नागेश याने दिलेल्या तकारीनुसार, पोलिसांनी दिलेल्या तकारीनुसार पोलिसांनी महेश गंगाराम शेळके (ऱा. शांतीनगर रत्नागिरी), शुभम सोळंखी (ऱा. गवळीवाडा- रत्नागिरी) व त्याचा अन्य एक साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, नागेश व संशयित आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत़. आरोपी महेश याने नागेश याच्याकडून 1 लाख 10 हजार रूपये उसने घेतले होत़े. याच पैशाच्या व्यवहारातून हल्ला करण्यात आल़ा.
 
नागेश गजबार हा रिक्षाचालक असून त्याचा मित्र महेश गंगाराम शेळके (रा. शांतीनगर, रत्नागिरी) याने नागेशकडे उसने पैसे मागितले होते. त्यानुसार नागेशने गळ्यातील चेन गहाण ठेवून महेशला 1 लाख 10 हजार रुपयांची रक्कम उसनी दिली होत़ी. उसने घेतलेले पैसे महेश देण्यासाठी टाळाटाळ करत होत़ा. नागेश सतत पैसे मागत असल्याचा राग मनात ठेवून महेशने नागेश याला धडा शिकवण्याचा प्लान तयार केल़ा. त्यानुसार महेश याने नागेशला फोन करून पऱ्याची आळी येथे येण्यास सांगितले होत़े.
 
30 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 8.30च्या सुमारास नागेश व संशयित आरोपी हे ठरल्यापमाणे पऱ्याची आळी येथे एकत्र आल़े. यावेळी त्यांच्यात पैशावरून वादावादी झाल़ी याच रागातून महेश, शुभम व त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराने नागेशच्या डोक्यात लादी घातली. तसेच धारदार कोयत्याने त्याच्या डोके, हातावर सपासप वार केले. तसेच संशयितांनी लागोलाग घटनास्थळावरून पळ काढला, अशी तकार रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल करण्यात आल़ी. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला नागेश आपला जीव वाचवत त्या तिघांच्या तावडीतून निसटला. रस्त्यावर येऊन त्याने एक रिक्षा अडवली व रिक्षेने तो आपल्या कुवारबांव येथील घरी निघून गेला. नागेशला जखमी झाल्याचे पाहून त्याच्या कुटुंबियांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Edited by: Ratnadeep Ranshoor