सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (20:52 IST)

मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, 9जणांचा चिरडून मृत्यू

accident
धुळ्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाल्याचे समजते. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातीलपळासनेर गावाजवळ भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला असून कंटेनर थेट एका हॉटेलमध्ये घुसला. त्यावेळी पाच जणांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. तर १५ ते २० जण जखमी असल्याचे बोलले जात आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे कळते.
 
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून जखमींची मदत केली जात आहे. तसेच अपघातस्थळी मोठ्या संख्येत जमाव एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे.
 
मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor