मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (22:50 IST)

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन नाहीत , त्यांची चौकशी योग्य पद्धतीनं सुरू : मुख्यमंत्री

राज्याचं अधिवेशन संपल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सचिन वाझे प्रकरणावर देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन नाहीत. त्यांची चौकशी योग्य पद्धतीनं सुरू आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
सचिन वाझेंवर चौकशी योग्य पद्धतीनं सुरू आहे. तपासाआधी फाशी देणं योग्य नाही. कुणी तपासाची दिशा ठरवू नये. कुणीही दोषी आढळला तरी कारवाई होणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच सचिन वाझे यांचा शिवसेनेसोबत कोणताही संबंध नाही. २००८ नंतर त्यांनी शिवसेनेचं सदस्यत्व पुन्हा घेतलेलं नाही. असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात कुणीही दोषी आढळला तरी कडक कारवाई होईल. विरोधीपक्ष नेत्यांनी त्यांच्याकडे सीडीआर असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी तो गृहविभागाकडे द्यावा. त्याची ही चौकशी केली जाईल. हिरेन प्रकरणात तपास गंभीरतेने सुरु आहे. तपासाआधीच फाशी देणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.