शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (07:43 IST)

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची खुर्ची, लॅपटॉप आणि गाडी जप्त करा; न्यायालयाचे आदेश

court
कोल्हापूर  विकासासाठी भसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला तीस वर्षांपासून दिला नसल्याने आज दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, लॅपटॉप, गाडी आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिलेत.सध्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे काम पाहतात. अधिकारी जिल्हाधिकाऱ्याची खुर्ची आणि इतर साहित्य होणार जप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रकार पहायला मिळत आहे.या आदेशामुळे मात्र सरकारी कार्यालयात खळबळ उडालीय.
या आदेशामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यावर नामुष्कीची वेळ आली की काय अशी चर्चा परिसरात होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याकरीता संपादित केलेला जमिनीचा मोबदला द्यायला विलंब केला म्हणून जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. 1985 साली रस्त्यासाठी जमीन मालक वसंत संकपाळ यांची जमीन ताब्यात घेतली होती.मात्र 2019 साल उजाडले तरी मोबदला दिला नव्हता.अखेर दिवाणी न्यायालयाने तीन महिन्याच्या आत रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा असा आदेश दिला होता. मात्र आदेश देऊनही जिल्हाधिकाऱ्यानी अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे कोर्टाने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना फटकारून त्यांचे साहित्य जप्त करण्याचे आदेश दिलेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor