गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शरद पवार पुन्हा लोकसभा लढवण्याची शक्यात म्हणाले विचार करतोय

राज्यातील आणि देशातील मोठा नेता असलेले शरद पवार यांनी निवडणूक लढवावी म्हणून त्यांना पक्षातून आग्रह केला जात आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये एक विशेष बैठक झाली आहे.

या बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे.  यावर पवार यांनी विचार करणार असल्याचे सांगितल्याने राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील चुरस वाढणार आहे, यावेळी पवारांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत स्पष्ट केले.  बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, गणेश नाईक, आनंद परांजपे आणि विजयसिंह मोहिते पाटील  आदि दिग्गज राष्ट्रवादी नेते उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील व  सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांनी पवार यांना केली आहे. यावर शरद पवार म्हणले की  माझी इच्छा नाही पण विचार करू, असे आपण त्यांना सांगितल्याचे पवार म्हणाले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण वाचले, संसदेच्या सभ्यतेला हरताळ फासणारे भाषण होते. मोदी त्यांच्यावर जसे संस्कार त्याला सुसंगत बोलले, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर अजित पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितले की   शिरूरमधून अजित पवार यांनी लढायची कोणतीच  आवश्यकता नाही. या ठिकाणी माझ्याकडे 5 ते 6 प्रबळ दावेदार आहेत, लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक एकत्र झाली तर महाराष्ट्राच्या जनतेची 7 महिने आधी  सुटका होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.