शरद पवारांनी पावसात भिजून आणलेलं सरकार आता जनतेचा घाम काढतंय: अनिल बोंडे
वर्धा : शरद पवारांनी पावसात भिजून सरकार आणलेलं सरकार आता जनतेचा घाम काढतंय अशी टीका माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे. शरद पवार पावसात भिजले म्हणून सरकार आलं असं म्हटल्या जातं आणि आता हेच सरकार लोडशेडिंग करून जनतेचा घाम काढतंय असा घणाघात बोंडेंनी केला आहे.
माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. सेनेसह महाविकास आघाडीतील हजारो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. वर्ध्याच्या आर्वी मतदार संघात पार पडलेल्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला गुड बाय केलं आहे. सत्ता असताना देखील कार्यकर्ते पक्ष सोडत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जिल्ह्यातील राजकारणात बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा सध्या वर्ध्यात सुरु आहे. सोबतच नवाब मलिक यांच्यावर देखील अनिल बोंडेंनी निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी बेहिशोबी मालमत्ता कुणाच्या भरवशावर केलीय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.