बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (13:24 IST)

धक्कादायक ! भीमा नदीच्या पाण्यात चार मुलं बुडाली

सोलापुरातील लवंगी गावात चार लहान मुले नदीच्या पात्रात पोहत असताना वाहून गेल्याची दुर्देवी घटना आज घडली .गावकरांनी मुले वाहताना बघून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले.या घटने मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र शोककळा पसरला आहे. 
 
ही घटना घडली तेव्हा गावातील रामलिंग तानवडे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते त्यांच्या समवेत त्यांच्या दोन मुली समीक्षा आणि अर्पिता तानवडे आणि त्यांच्या मेहुण्यांची मुलं आरती आणि विठ्ठल पारशेट्टी देखील नदीपात्रात पोहण्यासाठी आले.या चौघा मुलांपैकी समीक्षा आणि अर्पिता या दोघींना पोहता येत होते पण दुर्देवाने विठ्ठल आणि आरती या दोघांना येत नव्हते.अशा परिस्थितीत नदीपात्राचे अंदाज त्या दोघांना माहित नसल्याने ते दोघे बुडू लागले.तानवडे बहिणींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्या देखील पाण्यात ओढल्या गेल्या आणि  बुडाल्या.   
 
त्यांना बुडताना बघून शिवाजींना त्यांचा आवाज आला.ते आवाजाच्या दिशेने धावले आणि त्यांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु  पाण्यात प्रवाह जास्त असल्याने ते चौघे बुडाले.
या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून तानवडे कुटुंबावर शोककळा पसरला आहे.